shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी वसंत फलफले यांची बिनविरोध निवड.


इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी वसंत फलफले यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:दि ७ ऑक्टोबर २०२१ रोजी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन वसंत फलफले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी स्वेच्छेने राजीमाना दिल्याने रिक्त झालेले चेअरमन पदी निवड करण्यासाठी( दि ७) रोजी माजी चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली  विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.वसंत फलफले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बाळासाहेब बंडगर बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
 पतसंस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे नुतन चेअरमन वसंत फलफले यांनी सांगितले.प्रसंगी युवा नेते दिपक जाधव , इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम , पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक ज्ञानदेव बागल , हरिश काळेल , सुनिल वाघ , विलास शिंदे , संभाजी काळे , किरण म्हेञे , नितिन वाघमोडे , सुनंदा बोके , हनुमंत दराडे , सुभाष भिटे , सुनिल चव्हाण , गणेश सोलनकर, सचिव संजय लोहार , भालचंद्र भोसले उपस्थित होते.
नुतन चेअरमन वसंत फलफले यांचा तालुक्यातील  विविध भागातून आलेल्या शिक्षक , नातेवाईक , सामाजिक संघटना यांचे वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी गटनेते कैलास कदम , अनिल रूपनवर , ज्ञानदेव चव्हाण , वसंत फलफले , ज्ञानदेव बागल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनिल शिंदे , छगन मुलाणी , संदिपान लावंड , विलास पानसरे , अरूण मिरगणे , सुनिल कोकाटे , नजीर शिकीलकर , भारत ननवरे , विनय मखरे , सुरेश माने , लतिफ तांबोळी , विकास भोसले , योगेश पांढरे , आत्माराम मारकड , भुषण जौंजाळ , मैनुद्दीन मोमीन , सतिश खटके , सर्जेराव खुसपे , भारत गायकवाड , राहुल लंबाते , अमोल बोराटे , प्रविण ढुके , बापूराव राऊत , शिवाजी जाधव , किरण घाडगे , नितिन रणसिंग , सागर रणसिंग , जावेद मुलाणी , महेश नवले , राहुल कानगुडे , संतोष घोडके , योगीराज गाडेकर , तानाजी मदने , विकास वाघ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन माजी चेअरमन व संचालक किरण म्हेञे यांनी केले.आभार जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मानले.
close