shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्रीचे नऊ रंग,..!



१) पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

२) दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

३) तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

४) चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

५) पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

६) सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

७) सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

८) आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

९) नववा रंग "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे,कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या

जगाने हे नऊ रंग पाळले तर
आपल्या घरात शेजारी, समाजात, देशात जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील अनेक आशिर्वाद देतील.

स्त्रियांचा आदर करा
🌹🇮🇳🌹
close