shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घटस्थापनेच्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त मोहटादेवी ते निर्मलनगर पायी मशाल ज्योतीचे उत्साहात स्वागत...


निर्मलनगर तरुण मित्र मंडळाने मुर्तिस्थापना करून केली घटस्थापना ... !!

प्रतिनिधी : संजय वायकर

अ .नगर : दि . ७ /  अहमदनगर येथील सावेडी उपनगरातील निर्मलनगर गाडेकर चौक येथील निर्मल नगर तरुण मित्र मंडळाच्या तरुणांनी नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या निमित्ताने मोहटादेवी ते निर्मलनगर असा ६५ कि .मी . चा पायी प्रवास करून पारंपारिक मशाल ज्योत घेवून देवीची मुर्ती स्थापन करून  नवरात्रीच्या घटस्थापनेच्या उत्सवास सुरुवात केली . या पायी मशाल ज्योतीचे निर्मलनगर येथील अनेक तरुणांनी व महिलांनी उत्साहात स्वागत केले .

मागील वर्षी कोरोना काळा मुळे नवरात्र उत्सव साजरा करता आला नाही. या वर्षी जिल्हा प्रशासनाने व राज्य सरकारने देवस्थान बाबतीत नियम शिथिल करण्याची घोषणा केली, त्यामुळे आज‌ विविध  ‌ठिकाणी देवस्थान परिसरात घटस्थापना करण्यात आली.

निर्मलनगर येथील शारदीय नवरात्रोत्सव नगर तालुक्यात  प्रसिद्ध आहे . येथील नवरात्र उत्सवास एक वेगळेच महत्व आहे . या उत्सव सोहळ्यास अनेक भक्त पायी पाथर्डी येथील मोहटादेवी च्या दर्शनास जातात . येथूनच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पायी मशाल ज्योत घेवून येण्याची व घटस्थापना करण्याची पारंपारिकता निर्मल नगर येथील मंडळाने नेहमी प्रमाणे जपली आहे .

यावेळी निर्मलनगर तरुण मित्र मंडळातील अजय हिवाळे, राहुल सांगळे, अभिषेक खामकर , अविनाश खामकर , सागर गवळी, जावेद इनामदार, सुमित भोगे,अमित शिंदे , पप्पू जाधव, सागर सुपेकर , किरण सुपेकर, प्रथमेश कोल्हे, राहुल गारुळे, निखिल गांधी, चेतन आजबे, नामदेव मेने , मंगेश साबळे, विशाल कराळे, शंकर सातपुते, सागर औटी , सागर मेने ,सुशांत भिंगारदिवे, इरफान शेख,यश सरोदे,
समाधान दिक्षित,संतोष काळे,व्हिकी सोनवणे,रूपेश ठोंबरे,सौरभ तागड , महेंद्रसिंग ठाकूर ,लक्ष्मण बावडकर , व्हिकी शेळके,आकाश सुबेदार ,रोहित रोकडे,अजय पालवे,काका पालवे ,
गणेश कुबेर ,साजिद इनामदार,संतोष भराट ,अमित काळे ,अक्षय जवंजळे,मुकुंद मोरे ,
दिनेश रासवे ,रूषी भवर , संवेद वायकर आदी युवक उपस्थित होते .
close