पुणे (भोसरी) : आज दिनांक 25 ऑक्टोबर, सोमवारी, सकाळी 10:30 वाजता, भोसरी येथे अंकुशराव नाट्यगृहामध्ये रंगकर्मीचे दैवत नटराज व रंगमंचा ची पूजा करण्यात आली. ही पूजा प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रिय बेर्डे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव लांडे, रंगकर्मी संतोष साखरे, निर्माते बाळासाहेब बांगर, मारुती पोखरकर व दिग्दर्शक शिवा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रंगमंचाच्या पडद्याचे पूजन जेष्ठ रंगकर्मी भाऊ डोळस व निर्माते सतीशभाऊ फुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक रविभाऊ लांडगे, गोफणे सर हे ही रंगकर्मीना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. तसेच अनेक सन्माननीय रंगकर्मी हजर होते. त्यामध्ये रंगकर्मी विजय पानसरे, संभाजी बारणे, दिग्दर्शक प्रशांत गेडाम, दिग्दर्शक नंदू लोंडे, अभिनेत्री आरती पाटील, भारती चव्हाण, अमोल चिंचकर सर, कला दिग्दर्शक संदीप पंडित, मेकअपमन सुजित सुरवसे, विनोद मांजरे उपस्थित होते.
या कार्यक्रामात जेष्ठ रंगकर्मींचा व कार्यक्रमाचे आयोजक मारुती पोखरकर यांचा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच माहाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट अनुदान समितीवर निवड झालेले संतोष साखरे व प्रशांत गेडाम यांचाही सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी फिरोज मुजावर यांनी संगीताच्या तालावर नमन नृत्य सादर केले. तसेच अभिनेत्री प्रिया बेर्डे, शिवा बागुल, संतोष साखरे, बाळासाहेब बांगर, विजय पानसरे, नगरसेवक गोफणे व सतीश फुगे यांनी मोनगते व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये प्रियाताई बेर्डे यांनी सांगितले की, "खूप दिवस या रंगमंचापासून आम्ही रंगकर्मी दुरावलो होतो. आता खऱ्या अर्थाने ते सुरु होताना आनंद होत आहेत. आता भरभरून प्रेक्षकांनी हे नाट्य गृह फुलावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.” तसेच रंगकर्मी संतोष साखरे यांनी रंगकर्मी साठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भविष्यात रंगकर्मिसाठी अनेक सेवा सुविधा उपलब्द करून देण्यासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली. निर्माते बाळासाहेब बांगर व दिग्दर्शक शिवा बागुल यांनी नाट्यगृह व सिनेमा गृह चालू करण्यासाठी रंगकर्मी संघटकांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली व आज नाट्यगृह चालू केले म्हणून शासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आभार समारोप अभिनेते के. डी. कड यांनी केले..!
अशी माहिती रंगकर्मी फॅन क्लबचे संस्थापक शिवा बागुल, (दिग्दर्शक) यांनी दिली.

