shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..!!

शिर्डी । प्रतिनिधी :-

श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचा सन १९८५-८६ चा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा मुख्याध्यापक जे के बारगळ, सौ बारगळ ताई,ह भ प गोंदकर सर,श्री रसाळ सर ,सौ रसाळ ताई,श्री ढमढेरे सर,श्री राऊत सर,श्री नवले सर,श्री त्र्यम्बके सर, जोशी गुरुजी आदी प्रमुख उपस्थिती होती.



हा कार्यक्रम हॉटेल साई नीम ट्री येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रमेश शेळके, मंगेश लोढा,अजित पारख, वसंत वाणी सर,भाऊ भोसले,अशोक गोंदकर, विष्णू थोरात ,नाना जगदाळे आदींनी अथक परिश्रम घेतले,यावेळी सर्व शिक्षकानी आपले विद्यार्थी खूप मोठे झाले याचा त्यांना अभिमान वाटला, सर्व शिक्षकांनी आपला विदयार्थी शिवाजी गोंदकर शिर्डीचा नगराध्यक्ष झाला म्हणून त्यास सन्मानित केले यावेळी मा मुख्याध्यापक बारगळ सर यांना अश्रू अनावर झाले होते.

याप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी आपले गोड व कटू अनुभव सर्वांपुढे कथन केले.त्यामुळे  बोलताना अचानक हास्यकल्लोळ होत होता.या कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती.

close