अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुक्याची मासिक बैठक संपन्न.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुक्याची व शहराच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुक्याची मासिक बैठक(दि.१९ ऑक्टोबर) रोजी संपन्न झाली.पुणे जिल्ह्याचे जिल्हा संघटक शिवाजी खेडकर यांच्या उपस्थित बैठकीमध्ये तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली व निवडी संदर्भातले पत्र तालुका संघटक जनार्दन पांढरमिसे यांनी नियुक्ती पत्र दिले.
तसेच इंदापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे सहसंघटक म्हणून शामराव केशव जाधव, सचिव पदी महेश मोहिते, खजिनदार पदी अनिल चितळकर, दादासाहेब चव्हाण यांना सहखजिनदार तसेच कु. कविता कसबे यांना सहसचिव याप्रमाणे तालुका कार्यकारणी निवडण्यात आली .शहर कार्यकारणी मध्ये शहराचे संघटक पदी प्रशांत शिताप ,सहसंघटक लक्ष्मण गडदेसर , सचिव दशरथ भोंग यांना देण्यात आले .
या वेळी मार्गदर्शन जिल्हा संघटक शिवाजी खेडकर यांनी केले. त्या बैठकीला सव्वीस कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना व शासकीय कामकाज कशा पद्धतीने केले जाते या वरती मार्गदर्शन तसेच नागरिकांची होणारी लूट व प्रशासकीय कामकाजाविषयी चे मार्गदर्शन यावरती जिल्हा संघटक यांनी केले
. ग्रामीण भागांमध्ये सर्व गावातून कार्यकारणी गावपातळीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी जे देशाला व राज्याला जे अकरा कायदे दिलेले आहेत. त्या कायद्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. लोकायुक्त महाराष्ट्राला लवकरच लागू केला जाईल या संदर्भामध्ये अण्णासाहेब हजारे यांनी पुण्यामध्ये मुख्य सचिवांच्या मार्गदर्शना खाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे काम पूर्ण देशांमध्ये उभा करण्याचा निश्चय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केलेला असून यामध्ये तरुण वर्गांना एक मोठी संधी वेगवेगळ्या शासकीय समिती वरती व अनेक समित्या स्थापन करण्यास संदर्भामध्ये सर्व जिल्हा संघटक आणि तालुका संघटक यांना सूचना दिलेल्या आहेत. अशी माहिती इंदापूर शहराची नवनियुक्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास याचे इंदापूर शहर संघटक प्रशांत शिताप यांनी दिली.

