shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण : ११२‌ औषधी वृक्ष : चंदन


हा वृक्ष मराठीमध्ये चंदन,सफेद चंदन, हिंदीमध्ये संदल, संस्कृतमध्ये गंधसार, भद्रसार तर इंग्रजीमध्ये Sandalwood Tree या नावाने ओळखला जातो .
चंदनाचे औषधी गुणधर्म म्हणजे हे शांत आहे. चंदनाचा लेप अंगाला लावल्यास ताप उतरतो. त्वचा उजळते, शांत झोप येते, आनंद मिळतो. चंदन कामोत्तेजक आहे. शरीराचा दाह,कंड  शमविण्याची क्षमता चंदनामध्ये आहे. चंदनाचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने निर्मिती, त्वचा रोगासाठी उपयुक्त तेल निर्मितीसाठी होतो.

उदबत्ती,धूपकांडीत चंदन वापरतात.
शरीरावर दीर्घकालीन सूज असेल तर चंदनाचा लेप द्यावा. श्वासनलिकेमध्ये, अन्ननलिकेमध्ये दाह असेल, हृदयरोग, डोकेदुखी,भ्रमदोष, कृमीदोष, द्वेषाग्नी शमविण्याची क्षमता चंदनाच्या गंधात आहे. 
मात्र चंदन वापरताना घ्यावयाची काळजी म्हणजे ते मूळ स्वरूपात प्राप्त होणे गरजेचे आहे. कृत्रिमरित्या तयार केलेले चंदनतेल,खोड, लाकूड हे कुचकामी ठरते. बाजारात मिळणाऱ्या ज्या चंदन अगरबत्त्या केमिकल मिश्रित (artificially flavoured)असतात त्यामुळे अपाय होण्याचा संभव अधिक असतो.
चंदनाचे खोड मुळे साल तसेच बी यांचा वापर औषधी म्हणून केला जातो.

चंदनाच्या औषधी गुणधर्माची ओळख करून घ्या व आपल्या मित्रांना हे औषधी गुणधर्म सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेत सहभागी व्हा.
 
लेखक : चंद्रकांत शहासने : निसर्गोपचारक
मोबाईल : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित
close