shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात गॅंगवॉर;दोन टोळ्यांचा एकमेकांवर गोळीबार


पुणे :-पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून भयानक घटना समोर आली. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये फायरिंग झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीररीत्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ऊरुळी कांचन येथील तळवेडे चौकात हा प्रकार घडला. या गँगवॉर मध्ये आप्पा लोंढे टोळीतील संतोष जगताप त्याच्यासोबत तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून टोळीयुद्ध घडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोळीबारात संतोष जगताप, त्याचा साथीदार आणि विरुद्ध टोळीतील एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. टोळीयुद्धतुन अशाप्रकारे गोळीबार झाल्याने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या टोळीयुद्धतुन अशाप्रकारे गोळीबार झाल्यामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
close