शिर्डी । प्रतिनिधी :-
केंद्रातील भाजपा सरकारचे कुचकामी धोरण आणि निर्णय यामुळे देशभरात बेरोजगारी,शेतकऱयांवरील अन्याय आणि महागाईने तर मर्यादा ओलांडल्या आहेत.पेट्रोल,डिझेल,गॅस,तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे.याच्या निषेध करत शिर्डी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता दुचाकी ढकल आंदोलन करत शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची ही संविधान विरोधी,शेतकरी विरोधी व उद्योगपती धार्जिनी रणनीती उखडून फेकण्याशिवाय आता पर्याय उरलेला नसून शिर्डीतुन त्याची सुरुवात होईल.शिर्डी शहरातील सामान्य जनता त्यासाठी सज्ज झाली आहे.शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत हे चित्र स्पष्टपणे पहायला मिळेल.
यावेळी काँग्रेसचे विधानसभा नेते सुरेश थोरात,विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले यावेळी सुभाषराव निर्मळ,दिलीप कोते,सुरेश आरने,समीर शेख,सौरभ हाडवळे,मंगेश खाकाळे,गोविंद कोते,दीपक चौगुले,मोसीन सय्यद,अविनाश शेजवळ,योगेश गायके,नवनाथ आसने,हुसेन पठाण,उमेश शेजवळ,आरबाज कादरी,सुवरनेश् साबळे, आनंद घेगडमल,अक्षय शिंदे,डॉ भडांगे,विजय पवार,विशाल अहिरे,दिनेश रुकारे,स्वयंम चौगुले,साई गाडे, प्रणय राहणे,महावीर धुताडमल,आसिफ सय्यद,विशाल बर्डे,अमोल बनसोडे,सचिन गाडेकर, नितीन सदाफळ,सुरज महांकाळे,राजू दिघे,महेश साना,पंकज कदम,रवी इंगळे,कृष्णा गायकवाड,योगेश निरभावणे,तुकाराम आलोट, आदित्य आरने,अजीज बागवान,गुड्डू शेख,रमजान बेग,अन्सार शेख,आसिफ पठाण,आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आपला.
सचिन चौगुले.
शहराध्यक्ष-कॉंग्रेस कमिटी शिर्डी शहर.
मो.नं.9850199359

