शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. . !
भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब यांचे सचिवालय, तसेच जिओ / वि(VI) मुंबई, महाराष्ट्र मुख्य टीमनेही घेतली दखल...!
संगमनेर- मागील चार महिन्यांपासून वरवंडी आणि परिसरातील नागरिकांना मोबाइलला नेटवर्क नसल्याने मनस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
वरवंडी गावच्या सरपंच सौ.किरण गणेश गागरे आणि त्यांचे पती युवा उद्योजक गणेश गागरे व वरवंडी परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणारे युवक यांचे मार्फत जिओ मध्ये असणारे जास्तीत जास्त सिमकार्ड पोर्टींग विनंती टाकून जिओला नेटवर्क अडचणींविषयी जागरूक करण्याचा प्रयन्त केला यात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला पण जिओने काही दाखल घेतली नाही.
वरवंडी गावच्या सरपंच सौ.किरण गणेश गागरे यांचे पती युवा उद्योजक गणेश गागरे व वरवंडी परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणारे युवक यांचे मार्फत सदर वरवंडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय, याबद्दल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्याशी चर्चा झाली आणि सुरु झाला.... नॉट रिचेबल वरवंडी गावं लवकरात लवकर नेटवर्कयुक्त कसे होईल यासाठीचा पाठपुरावा...
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून सदर अडचणींविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेपर्यंत सदर प्रश्नाविषयी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी मा.श्री.अश्विनीजी वैश्नवसाहेब,मा.दुरसंचारमंत्री,भारत सरकार तसेच प्रोटोकॉल प्रमाणे सदर अडचणींशी संबंधित सर्वांना मेल केला.
महामहीम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब यांचे सचिवालयाचे विशेष कर्तव्यावर अधिकारी आर. के. शर्मा यांनी सदर मेलला विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमप्राधान्याने सोडविण्यात यावा अशी रिमार्क देत संबंधित विभागाला सूचित केले.
तसेच टिम जिओ आणि VI,मुख्य आँफिस ,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्याशी कॉल वर चर्चा तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेला वि vi ने केल्याल्या मेल वर लवकरच नेटवर्क टिम अपाँईट करुन अहवाल आल्यानंतर योग्य त्या उपाययोजना करून वरवंडी परिसराला पुढील २-३महिन्यात नेटवर्क उपलब्ध होईल असे नमूद केले असल्याचे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,
शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी दै.शिर्डी एक्सप्रेस शी बोलताना सांगितले.

