shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक प्रकार..! पुण्यातल्या हडपसरमध्ये पैशाच्या वादातून मित्राला जिवंत जाळले..!


पुणे:-पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उसन्या घेतलेल्या पैशांवरून वाद झाल्यानंतर एकाने आपल्या मित्राच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संतोष आणि मनोज एकमेकांचे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांचा विवाह झालेला आहे. काही दिवसांपूर्वी संतोषने मनोजला उसने पैसे दिले होते. हे पैसे परत कर यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. गुरुवारी ते दोघे फुरसुंगी भेटले असताना त्याचा पुन्हा एकदा या उसन्या पैशावरून वाद झाला. याच वादातून मनोजने बाटलीतून आणलेले पेट्रोल संतोषच्या अंगावर टाकत त्याला पेटवून दिले आणि तो पसार झाला.

या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या संतोषला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घेऊन पंचनामा केला. फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या पाण्यात मनोज कांदे याला अटक केली.

पोलिसांनी प्रथम या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला होता. त्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.
close