shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील आणखी तेरा गावात कडक लॉकडाऊन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १८ ऑक्टोंबर २०२१.
अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी ६१ गावांत लॉकडाऊन केले होते. आता पुन्हा नगर जिल्ह्यातील नव्याने १३ गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आहे. त्याबाबतीत आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ३०० ते ५०० आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित होण्याचे प्रमाण हे ३ ते ५ टक्के आहे. दरम्यान जिल्ह्यात २० पेक्षा अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या गावात जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलिस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणे, कोरोना नियमानुसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढवणे, या उपाययोजना केल्या जात आहेत.

नव्याने १३ गावांत आता कडक निर्बंध लागू केले आहेत. तेथे अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, कोरोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व व्यववहार १४ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे. याशिवाय या गावांत जमावबंदीचाही आदेश देण्यात आला आहे. या गावांच्या हद्दीतून कृषी माल आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत.


 
आधीच्या आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुधारित आदेश दिला आहे. त्यानुसार नव्या १३ गावांत २३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन तर आधीच्यापैकी ८ गावांत कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या आदेशातील ६१ गावे मात्र लॉकडाउनमधून मुक्त झाली आहेत. जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण अद्यापही समाधानकाररित्या कमी झाले नाही. दहा दिवसांपूर्वी सातशे ते आठशे दैनंदिन रुग्ण आढळत होते. आता ते प्रमाण ३०० ते ५०० झाले आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट आता तीन ते पाच टक्के आहे. त्यामुळे वीस पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत उपाययोजना कडक करण्यात येत आहेत.

या गावामध्ये होणार लॉकडाऊन-

लॉकडाऊन लागू केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बुद्रूक (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासे), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी, चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे. त्यामुळे सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, कोरोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व १४ ऑक्टोबरला पहाटे १ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत बंद असणार आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close