------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील साळेगाव येथील २९ वर्षीय युवा शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे खचून जात स्वतःच्या शेतातील लिंबाच्या जडले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास घडली आहे.
साळेगाव ता केज येथील बालासाहेब रामलिंग गित्ते वय (२९ वर्ष) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके मातीसह वाहून गेल्याने काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात केलेला पेरणी बी बियाणे व आंतरमशागतिचा खर्च यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. मयत बालासाहेब गित्ते याने त्याच्या शेतात यावर्षी सोयाबीन पेरले होते. अतिवृष्टीने पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे खचून गेलेल्या बालासाहेब रामलिंग गित्ते वय २८ वर्ष या युवकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीस खचून जाऊन मंगळवा नरी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास साळेगाव येथील माळेगाव लवण नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान आत्महत्येची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक अशोक गवळी व गृहरक्षक दलाचे जवान यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या नंतर उपजिल्हारुग्णालय केज येथे डॉ. लांडगे यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी शवविच्छेदन केले.
मयत बाळासाहेब गित्ते यांच्या पश्चात पत्नी कोमल बालासाहेब गित्ते वय २४ वर्ष दोन मुले चि. आदित्य बालासाहेब गित्ते ( ६ वर्ष ) व कु. अंजली बालासाहेब गित्ते ( ४ वर्ष ) असा परिवार आहे .

