shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा.रजनीताई पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट..!!



(खासदार झाल्यानंतर झाली प्रथमच भेट)
------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                   राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच खा.रजनीताई पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेऊन जम्मू व काश्मीर मधील सद्य परिस्थिती यासह विविध विषयांवर चर्चा केली.
  

             
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच खा रजनीताई पाटील यांनी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांचे आभार मानून जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिहारी नागरिकांचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीर मधील सद्यस्थितीची माहिती तिथल्या प्रभारी या नात्याने दिली तसेच मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे झालेले नुकसान याचीही खा. रजनीताई पाटील यांनी माहिती दिली. यासह अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली व खासदार पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
close