प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
कोटा राजस्थान च्या बंसल क्लासेसची गुणवत्ता ग्रामीण भागातील सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणार असल्याचे पाहून अतिशय आनंद होत आहे , आता जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळख पुसायची आसेल तर बीड जिल्ह्याचा वेगळा पॕटर्न व्हावा अशी ईच्छा आहे अस ना. धनंजय मुंडे यांनी केज येथील क्लासेस च्या उदघाटन प्रसंगी केले यावेळी आ. संजय दौंड , मा. आ. पृथ्वीराज साठे , जि. प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे , उपजिल्हा अधिकारी शरद झाडके , हारुण इनामदार आदि उपस्थित होते.
केज येथे हारुण इनामदार यांच्या जिवन शिक्षण संस्थेच्या शाळेत कोटा राजस्थान येथील बंसल क्लासेसच्या फ्रन्चाझिजचे उदघाटन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला यावेळी आ. संजय दौंड , मा आ. पृथ्वीराज साठे , जि प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे , संस्थेचे हारुण इनामदार , उपजिल्हा अधिकारी शरद झाडके , तहसिलदार मेंडके , उपशिक्षण अधिकारी हिरालाल कराड , गट शिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे , सिताताई बनसोड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .
यावेळी प्रास्तविक बंसल क्लासेसचे संचालक डॉ रामेश्वर बांगड यांनी केले तसेच हारुण इनामदार , आ. संजय दौंड यांनी मनोगत व्यक्त केले अविनाश भारती यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लागले .
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात बंसल क्लासेसच्या उदघाटन प्रसंगी बंसल क्लासेसच्या बियाणी व सर्व टीमला शुभेच्छा दिल्या तसेच बीड जिल्ह्याची ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळख पुसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आता गुणवत्ता महत्त्वाची आहे मिळणाऱ्या गुणाबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वाढवली पाहिजे अभ्यास वाढला पाहिजे व स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून गुणवत्ता सिध्द झाली पाहिजे. समाज कल्याण विभागाचा मंत्री म्हणून विद्यार्थ्यांना लवकरच बार्टी व सारथी च्या शाखा पण जिल्ह्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न करील असा शब्द दिला.

