shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषिकन्याचे गणेशवाडीत शेती मार्गदर्शन..!!


प्रतिनिधी, मोहन शेगर,
सोनई--ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. भक्ती राजेंद्र डाके हिने ग्रामीण कृषी जागरूकता  शेती पूरक व्यवसाय वाढीसाठी विविध प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 


पिकावरील रोगनियंत्रण, दुधापासून विविध पदार्थ कसे बनवावे,डाळिंबावरील तेल्या रोगाविषयी माहिती देऊन उपाय योजना काय करायचं, तसेच चारा प्रक्रिया माती परीक्षण,जनावरांच्या लसीकरण बाबत मोबाईल अप चा वापर कसा करावा, तण नियंत्रण साठी पध्दती, फळ बागांची लागवड,पिकासाठी योग्य खताचा वापर कसा करावा, आदी माहिती डाके हिने देऊन प्रात्यक्षिक करून माहिती दिली.   

या प्रकल्पाअंतर्गत  निवडलेल्या नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय मोहन दरदले   यांच्या शेत शिवारात प्रकल्पाचे प्रतिक्षिक करून पिकावरील पडणाऱ्या रोग,व किडप्रादूर्भाव नष्ट करून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून औषध फवारणीने शेती उत्पन्न वाढीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांना  भक्ती डाके हिने माहिती दिली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.मोरे, व उपप्राचार्य डॉ. गावांदे सर,प्रा. पेरणे एस.एम. यांचे मार्गदर्शन लाभले.
close