शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
अहमदनगर : नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये हाणामारीत एका तरूणाचा खून झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. सायकल लावण्याच्या क्षुल्लक कारणामुळे हाणामारी झाली असून यामध्ये जावेद गनीभाई तांबोळी (वय ३५, रा. वाळकी, ता. नगर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. वाळकी गावामध्ये एकाच गल्लीत राहणाऱ्या लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरुन किरकोळ वाद निर्माण झाला. लहान मुलांचे भांडण मोठ्यांच्या भांडणात परावर्तित झाले.
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सलीम शेख, बाबू शेख व बादल शेख या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. आणखी काही जण पसार आहेत. वाळकी येथे रविवारी तांबोळी आणि शेख यांच्यासोबत इतर तिघांचे वाद झाले. घरासमोर लावलेल्या सायकली धक्क्याने पडल्या. त्यावरून तांबोळी यांच्याबरोबर वाद झाले. या वादातूनच तांबोळी याला लोखंडी रॉडने मारहाण झाली. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर शेखने आणखी लोकांना बोलावून घेत तांबोळी याच्यावर चाकूने हल्ला चढविला. एकटाच सापडलेला जावेद तांबोळी याने आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढला.
या मारामारीत तांबोळी याच्या डोक्यात दगड मारण्यात आला. घटनेनंतर त्याला नगर येथे उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी करत तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

