shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र सरकारने गांजा प्रकरणे मार्गी लावण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्याकडे लक्ष घालावे - राजेंद्र गोंदकर

शिर्डी । प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी आत्महत्येचे पुन्हा एक प्रकरण घडले आहे.ह्याबाबत बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ह्यांनी महाराष्ट्र सरकारने गांजा प्रकरणे मार्गी लावण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्याकडे लक्ष घालावे अशी टिका केली आहे.

शेवगाव आगारा मध्ये राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी दिलीप हरीभाऊ काकडे ह्यांनी एसटी बस ला गळफास लाऊन आत्महत्या केली. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळ कर्मचारींचे आत्महत्येचे प्रमाण मागिल वर्ष भरा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या कर्मचारी वर्गावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर हा वाढतच आहे परंतु महाविकास आघाडी सरकारचे त्याकडे लक्ष नाही असे गोंदकर बोलले.

गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यात महसूल मंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या संगमनेर मध्ये परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली होती मृतक चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते.धुळ्यातही ऑगस्ट महिन्यामध्ये बसचालक कमलेश गोडसे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती.अशा घटना आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यात शोभनीय नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत.पगार झाले तरी पगाराची रक्कम ही तुटपुंजी असते. या तुटपुंज्या रकमेवर कर्मचाऱ्यांना त्यांची व त्यांच्या कुटुंबाची दैनंदिनी चालवावी लागते. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याची पगार वाढ व्हायलाच हवी.

महा विकास आघाडी सरकार जावयाचे गांजा प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मागील दोन महिन्यापासून व्यस्त आहे. तसेच उत्तर प्रदेश मध्ये राहुल गांधी व प्रियंका गांधी साठी राजकिय वातावरण तयार करण्यात व्यस्त आहे. नवनवीन घोटाळे व वसुली प्रकरण मार्गी लावण्यात सरकार वेळ घालवतेय परंतु सरकारी कर्मचारी व कर्मचारी वर्गांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकार संपुर्ण निष्क्रिय ठरलेले आहे असे गोंदकर बोलले.

शेवगाव आगारात दिलीप हरीभाऊ काकडे या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे. कर्मचारी आत्महत्या प्रकरणी संपुर्ण भारतीय जनता पार्टी हि कर्मचारी परिवारा सोबत आहे. त्याच्या हक्का नुसार न्याय मिळवून देण्यासाठी कर्मचारी व कर्मचारी परिवारा सोबत कायम उभी राहिल असे गोंदकर बोलले.

राज्याचे मुख्यमंत्री हे सामान्य जनतेच्या मतांवर निवडून आलेले नाहीत.त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या समस्या कशा समजणार धोखाधडी ने सत्तेत बसलेले हे सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष न देता वसुली करून स्वतःची खळगी भरण्यात गुंग आहे.महाआघाडीचे सरकार सत्तेत येऊन आता दोन वर्षे होतील पण अजून यांनी जनतेच्या हिताचे तसेच सामान्य जनतेला आधार वाटेल असे ठोस एकही काम राज्यात केलं नाही असे यावेळी गोंदकर म्हणाले.
close