shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज उपजिल्हा रुग्णालयात तील निवासस्थाने हे कर्मचारी वर्गासाठी की सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी?

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी बाह्या निवासस्थानात कसे राहात असतील हा प्रश्न पडला आहे. ज्या वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयाल केजला तीन तीन महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक भेटले त्या कर्मचाऱ्यांवर माणसा ऐवढ्या वाढलेल्या गवतात कुठलीही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसलेल्या साप,विंचू या सरपटणाऱ्या प्राण्या च्या भितीच्या सावटा खाली राहावे लागते व ड्युटीवर यावे जावे लागते.



याचॆ कुणालाच सोयरसुतक नाही.घरभाडे,लाईट बील ,महिन्याच्या महिन्याला पगारातुन कट करणाऱ्या रुग्णालय कार्यालयाला ना सार्वजनिक बांधकाम विभागाला.किती वेळेस कार्यालयास कळवले तरी गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनास काही एक देणे घेणी नाही. कारण त्यांना येऊन जाऊन करायचे आहे,तेथे राहीचेच नाही तर दुःख काय कळणार.कमीत कमी आता तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आशी केज ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भावना झाली आहे.

close