shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गांजपूरच्या सरपंच सौ.सुनंदा डापकर बडतर्फ..!!

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

भ्रष्टाचाराचे आरोप असलेली बहूचर्चीत ग्राम पंचायत गांजपूर च्या सरपंच सौ.सुनंदा श्रीराम डापकर यांना दि.२५/१०/२०२१ रोजी मा.अप्पर आयुक्त औरंगाबाद यांनी पदावरून काढून टाकले आहे.

 या बाबत सविस्तर वृत्त असे की,धारूर तालुक्यातील ग्राम पंचायत,गांजपूर च्या सरपंच सौ.सुनंदा श्रीराम डापकर या २०१७ साली जनतेतून सरपंच झाल्या होत्या.

              


परंतू त्या नामधारी सरपंच होत्या. त्यांचा मुलगा जालिंदर श्रीराम डापकर हे कारभार पाहत होते या मुळे ग्रा.पं कारभारात सरपंचाची अकार्यक्षमता व अनियमितता दिसत असल्याने सुर्यकांत बाबाराया डापकर,आबासाहेब चंद्रसेन सिरसट,महादेव बाबासाहेब मुंडे,विजयकुमार आनंदराव मुंडे,दिनकर आण्णा डापकर,धनराज साहेबराव घुगे यांनी मा.अप्पर आयुक्त औरंगाबाद यांचे कडे ग्रा.पं.अधिनियम ३९(१) अन्वये तक्रार दाखल केली होती.

     

या तक्रारी नुसार गट विकास अधिकारी,धारूर यांच्या चौकशी समिती मार्फत चौकशी होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी,बीड यांचे समोर सुनावणी होऊन प्रकरण मा.आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मा.अप्पर आयुक्त यांचे न्यायालयात सुनावणी होऊन वादी व प्रतिवादी यांना योग्य संधी देवून सरपंच सौ.सुनंदा डापकर या ग्रा.पं.अधिनियम ३९(१) अन्वये आपले कार्य पार पाडण्यास असमर्थ  असल्याचे नमुद करून अंतीम निकाल दि.२५/१०/२०२१ रोजी देण्यात आला आहे.

सदरील निकालानुसार सरपंच सौ.सुनंदा श्रीराम डापकर यांना पदावरून काढण्यात आलेले आहे. तक्रारदारांच्या वतीने ॲड.ईश्वर मुरगे यांनी बाजू मांडली.त्यांना प्रा.ईश्वर मुंडे यांनी सहकार्य केले.

close