शिर्डी । प्रतिनिधी :- राहाता तालुक्यातील शिर्डी येथील साईबाबा संस्थांनचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी श्यामसुंदर शहाणे, वय ७५ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने श्रीरामपूर येथे निधन झाले आहे. त्यांनी भारतीय नौसेनेत देखील देश सेवा केली होती. त्यांचा देशभर मोठा जनसंपर्क होता.अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे देश-विदेशातील विविध राजकीय नेते व उद्योगपती यांच्याशी देखील त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
साईबाबा संस्थान मध्ये १४ वर्षे जनसंपर्क अधिकारी पदावर काम करताना साई संस्थांनच्या विकासात देखील त्यांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. काही दिवसापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा विजय शहाणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याचाही त्यांना मोठा धक्का बसला होता.
त्यांच्यामागे पत्नी, सून, एक नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिर्डी साई भक्तांकडून हळहळ व्यक्त केले जात आहे.

