shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या विनायक नरवडे यांचा जिजामाता विदयालयात सन्मान


प्रतिनिधी : प्रविण देशमुख 

नेवासा :  ४ /   जीवनात दररोज घडणाऱ्या लहान गोष्टी देखील आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात ,म्हणून 'पहा व शिका ' हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे .विदयार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न केले व परीश्नम घेतले तर निश्चित केल्यास यश प्राप्त होते . गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड दया तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा ,असे विचार श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांनी मांडले .

        श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्था व ज्ञानेश्वर उदयोग समूह व जिजामाता विदयालय माजी विदयार्थी संघ यांच्यासहयोगाने यु.पी.एस.सी परीक्षेत देशात ३७ वा क्रमांक व महाराष्ट्रात २ रा क्रमांक मिळविणारा  विदयार्थी विनायक कारभारी नरवडे  यांचा सत्कार जिजामाता विदयालय, भेंडा येथे दि ३ ( रविवार ) रोजी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ नरेंद्र घुले पाटील होते .

      यावेळी माजी आ पांडूरंग अभंग, अॅड देसाई देशमुख, काशिनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गुलाबराव खरात, डॉ कारभारी नरवडे, सौ. नरवडे, डॉ शिवाजी शिंदे, अशोकराव मिसाळ, संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रविंद्र मोटे, डॉ जगन्नाथ नरवडे, एकनाथ कोलते, आदी उपस्थित होते .
       या सत्काराला उत्तर देताना विनायक नरवडे म्हणाले, जीवनात कधीही हताश होऊ नका . प्रामाणिक प्रयत्न केल्यावर परमेश्वराचा कृपाआर्शीवाद मिळतोच, यश प्राप्त होतेच. जीवनात खरे बोला, दररोज नवीन शिकत जा . मोठी स्वप्न पहा व कष्ट करून स्वप्न पूर्ण करा त अमेरीकेतून नोकरी सोडून जनसेवा व देशसेवेकरिता परत मायदेशी आलो, पुढील जीवन  प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेसाठी असेल .

          यावेळी प्रास्ताविक डॉ शिवाजी शिंदे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी गुलाबराव खरात म्हणाले, घुले पाटील शिक्षण संस्थेचे अनेक विदयार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे .

          याप्रसंगी प्रा भारत वाबळे ,प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य भाऊसाहेब विधाटे, पर्यवेक्षक  बाबासाहेब धनवटे, श्रीमती महाजन बी एस , जलमित्र सुखदेव फुलारी, अशोक वायकर, गणेशराव गव्हाणे, डॉ संतोष फुलारी, शंकरराव भारस्कर, उपसरपंच दादा गजरे, संजय मनवेलीकर, रामकृष्ण नवले, पत्रकार नामदेव शिंदे, रमेश पाडळे , प्रा संतोष सोनवणे, संजय मनवेलीकर ,प्रा सुधाकर नवथर  प्रा गोरक्षनाथ पाठक ,सतीश वाणी, रावसाहेब मरकड आदी उपस्थित होते . या कार्यकमाचे सूत्रसंचालन नानासाहेब खराडे यांनी तर आभार प्रा भारत वाबळे यांनी आभार मानले .
close