shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बीड जिल्हा केज आंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या - बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे यांची मागणी..!!

प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-

मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याने होत्याचं नव्हतं झालंआणि सारं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलंअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला विशेषता केज, आंबेजोगाई तालुक्याला झाला धनेगाव धरणाचे18 दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आल्याने सर्व प्रकारच्या नद्या-नाल्या  तुडुंब भरून वाहिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले . शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे . 


अनेक गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेला पंचनामा ही करता येत नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना आमदार खासदार मंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी नुसता दौरा करून पाहणी  करण्यापेक्षा शासनाने तात्काळ मदत मराठवाड्यातील विशेषता बीड जिल्हा केज , आंबेजोगाई तालुक्याला जाहीर करून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत शासन स्तरावर  द्यावी . तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बहुजन रयत परिषद चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषद चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पत्रकारांशी बोलताना केली आहे.

close