शिर्डी एक्सप्रेस न्युज नेटवर्क:
पुणे - राजेंद्र पेट्रोलपंपाचे संस्थापक कै.तात्यासाहेब नारायण खेडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने लोणी काळभोर कोळपे वस्ती येथील वनविभाग,परिसरात एक सामाजिक कार्य म्हणून राजेंद्र पेट्रोल पंप माळीमळा,व ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने वड,पिपंळ ,कडुनिंब ,चिंच ,अर्जुन, करंज, अशा विविध जंगली वृक्षांचे वृक्षारोपण करून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व संपूर्ण जगाला समजले आहे. झाडापासून मोफत ऑक्सिजन मिळतोपण झाडाचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होत आहे . त्यामुळे नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.
या प्रसंगी लोणी काळभोर मा सदस्य पांडुरंग केसकर, राजेंद्र पेट्रोल पंप चे मालक हेमंत खेडेकर,वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, धनगर समाज सेवा संस्था चे भाऊसाहेब कोळपे, सुभाष आण्णा विरकर,सनी गिरी,अभिषेक शेंडगे, बिरूदेव भास्कर, निरक बिका,जीवन जाधव यांच्या हस्ते नुकतेच वृक्ष रोपण करून समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला.
स्व. तात्यासाहेब नारायण खेडेकर यांना ग्रीन फाउंडेशन,वनव्यवस्थापन समिती, लोणी काळभोर ग्रामस्थ, यांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. वृक्षारोपणचा उपक्रम स्व. तात्यासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हेमंत खेडेकर यांनी वृक्षारोपण उपक्रम प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

