प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२०-२१ ची अर्धिक वर्षाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारणसभा सभा आँनलाईन पध्दतीने गुरूवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास चेअरमन मा श्री रमेशराव आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेत चेअरमन रमेश आडसकर यांनी सांगितले की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील जुन्या साखर कारखान्यापैकी एक आहे. या कारखान्याला कोणत्याही बँकेची आर्थिक मदत नसतानाही गेल्या वीस वर्षांपासून चालू आहे.ही संस्था टिकावी म्हणून आमच्या संचालक मंडळांचा कशोसीने प्रयत्न चालू आहे.तरी भविष्यकाळात हि संस्था वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना, शेतमजूरांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही चेअरमन आडसकर यांनी सांगितले.
यावेळी सर्व सभासदांचे चेअरमन रमेश आडसकर यांनी आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक यांनी सभेच्या कामकाजात बहुसंख्येने आँनलाईन सहभाग नोंदविला.यावेळी कार्यकारी संचालक एस बी साखरे, फायनान्स मॅनेजर जि एस मुळे, कार्यालयीन अधीक्षक एस बी राऊत यांच्यासह सर्व खातेप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती.

