लाखेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न.
आढावा बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड.
मनेश जाधव यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी:(३ ऑक्टोबर २०२१) राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन लाखेवाडी येथे (दि.३ ऑक्टो) रोजी केले होते.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा प्रभारी किरणजी गोफणे, इंदापूर तालुका प्रभारी सतीश नाना तरंगे, रासप नेते शहाजी भाळे,रवि भाळे, मनेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
सदर बैठकीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला व जुने व नवीन कार्यकर्त्यांनी पुढे पक्ष वाडीसाठी आपले विचार मांडले. तसेच गाव तिथे शाखा घर तिथे रासप कार्यकर्ता असा संकल्प करण्यात आला.
यावेळी रासप मध्ये नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, तसेच या बैठकीमध्ये सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवीन पदनियुक्ती करण्यात आल्या, यामध्ये मनेश जाधव यांची इंदापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी, ज्योतीराम खताळ इंदापूर प्रसिद्धीप्रमुख ,अविनाश मोहिते इंदापूर विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष,
गणेश हेगडकर, इंदापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष , राजेंद्र जानकर, इंदापूर तालुका विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ,समाधान काशीद, निमगाव, निमसाखर जि.प गट अध्यक्ष,कुलदीप वाघमोडे लाखेवाडी गण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्या.
यावेळी ऋषी मदने, नवनाथ कुलाळ, सुभाष मारकड, सोन्या जानकर, तात्याराम मारकड, सागर सानप, सलीम मुलानी,संतोष माने , लिंगेश्वर बोडके, समाधान घोडके, महेश तरंगे, किरण घोडके, तारेश्वर मारकड, निखिल मारकड, बबलु किर्तकर, दयानंद हेगडकर, दत्तात्रय देवकाते, उमाजी जाधव,सचिन मारकड, दादा गोफणे, रामभाऊ घोडके, आभिजित मारकड,अक्षय मारकड असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हेगडकर यांनी केली. अशी माहिती इंदापूर तालुका प्रभारी सतीश तरंगे यांनी प्रसिद्धीस दिली.

