shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर नगरपरिषदेतील सफाई कामगारांना पुरण- पोळी च्या गोडधोड जेवणाची मेजवानी.लिनस क्लब आॅफ इंदापूर सिटीचा अनोखा उपक्रम.. सदस्यांनी स्वतः स्वयंपाक बनवून पुरण- पोळीच्या गोडधोड जेवणाची केली मेजवानी.

इंदापूर नगरपरिषदेतील सफाई कामगारांना पुरण- पोळी च्या गोडधोड जेवणाची मेजवानी.

लिनस क्लब आॅफ इंदापूर सिटीचा अनोखा उपक्रम.. सदस्यांनी स्वतः स्वयंपाक बनवून 
पुरण- पोळीच्या गोडधोड जेवणाची केली मेजवानी.

इंदापूर  प्रतिनिधी:लिनेस क्लब आॅफ इंदापूर सिटी च्या वतीने दि.२ आॅक्टोबर ते दि. ७ या कालावधीमध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहाअंतर्गत आज (दि.३ ) रोजी इंदापूर नगरपरिषदेतील सफाई कामगारांना पुरण- पोळी च्या गोडधोड जेवणाची मेजवानी देण्यात आली.
दरम्यान लिनेस क्लबच्या अध्यक्षा, सदस्या यांनी सफाई कामगार तसेच उपस्थितांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना लिनस क्लब आॅफ इंदापूर सिटी च्या अध्यक्षा सायरा हमीद आत्तार म्हणाल्या, शहरात गेली पंधरा वर्षांपासून आम्ही लायनेस क्लबच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतो. आता लिनेस क्लब ची स्थापना केली असून या क्लब मार्फत दि.२ आॅक्टोबर ते दि. ७ आॅक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत दि. २ रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यादिवशी नगरपरिषदेतील कर्मचारी, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.
तसेच आज (दि.३ ) रोजी इंदापूर शहर स्वच्छ व कचरामुक्त राखण्यास हातभार लावणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना पुरण -पोळीच्या जेवणाची मेजवानी देण्याचा उपक्रम राबविला असल्याचे सायरा आत्तार यांनी सांगितले.
यावेळी लिनेस क्लबच्या या उपक्रमास नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, कार्यालयीन अधीक्षक गजानन पुंडे यांनी क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सायरा आत्तार, सदस्या शामला घासकाटू, उज्ज्वला गायकवाड, अर्चना शिंदे, कल्पना भोर, लता नागपुरे, उर्मिला होमकर तसेच हमीद आत्तार, प्रा. भिमराव भोर, बाळासाहेब नागपुरे, रोहन भोर आदींनी परिश्रम घेतले.
close