प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल - गेल्या ३ ते ४ दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे पारोळा - कासोदा रस्त्यावरील मालखेडा गावाजवळ पुल वाहुन गेल्याने रहदारी पुर्णपणे बंद होती. आज आमदार चिमणराव पाटील यांनी सदर पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करून तात्पुरती डागडुगी करून रहदारी सुरू करण्यात आली.
पारोळा- कासोदा रस्त्यावरील मालखेडा गावाजवळ पावसाच्या पाण्यामुळे पूल पूर्णपणे वाहून गेलेला आहे. त्यामुळे रहदारी व दळणवळण पूर्णपणे बंद आहे. तसेच मालखेडा उमरे या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दळणवळणासाठी रस्ताच बंद असल्याने रस्ता लगत असणाऱ्या गावातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, दळणवळण यासारख्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच रहदारी बंद असल्याने बस सेवा देखील बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यामुळे पारोळा कासोदा रस्त्यावरील मालखेडा गावाजवळील पुलाच्या बांधकामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून मिळावा व नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यात यावी असे पत्र आमदार चिमणराव पाटील यांनी दिले आहे
मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे पुलाचा पुर्नबांधणीसाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची मा.आबासाहेबांनी पत्रान्वये मागणी केली.
यासमयी पारोळा बाजार समितीचे मा.उपसभापती मधुकर पाटील, मा.सरपंच मुकुंदा पाटील, सरपंच, उपसरपंच , सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

