shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बालेवाडी येथे होणाऱ्या कुस्ती चाचणी स्पर्धेसाठी पिठेवाडीतील ओंकार वाघमोडे यांची निवड

बालेवाडी येथे होणाऱ्या कुस्ती चाचणी स्पर्धेसाठी पिठेवाडीतील ओंकार वाघमोडे यांची निवड.
 इंदापूर प्रतिनिधी:पिठेवाडी येथील   अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाचा निर- निमगावचा विद्यार्थी ओंकार सतीश वाघमोडे याची बालेवाडी पुणे येथे बुधवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .वयोगट ६ ते १२ मधून  निवड झाली .इंदापूर तालुका क्रीडा नैपुण्य चाचणी स्पर्धा शुक्रवारी तालुका क्रीडा संकुल येथे पार पडली त्यातून ही निवड करण्यात आली. 

या निवडीबद्दल पिठेवाडीतील ग्रामस्थांसह विद्यालयाचे अध्यक्ष दत्तामामा घोगरे, मुख्याध्यापक बी.जे. गरगडे. प्राथमिक चे मुख्याध्यापक पिसे क्रीडाशिक्षक जाधव सर ,जगताप मॅडम यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

निर- निमगाव, पिठेवाडी पंचक्रोशीत ओंकार वाघमोडे याचा विशेष कौतुक होत आहे.
close