shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कैलास न्याती, सचिवपदी नितीन पाटील यांची निवड...!!


प्रतिनिधी। एरंडोल
एरंडोल :-  तालुका औषध विक्रेता संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कैलास न्याती तर सचिवपदी कासोदा येथील नितीन पाटील तर एरंडोल शहर अध्यक्षपदी सतीश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
       फोटो :- अध्यक्ष -कैलास न्याती

 या कार्यकारिणीला उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. या सभेसाठी कासोदा, उत्राण, विखरण, खडके, पिंपळकोटा, निपाने येथील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली औषध विक्रीचा व्यवसाय करताना इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून  होणारी ऑनलाईन औषध विक्रीला आव्हान देण्यासाठी प्रत्येक सभासदाने अपडेट होण्याचे अध्यक्ष कैलास न्याती यांनी सांगितले.        फोटो :- सचिव :- नितीन पाटील
नूतन कार्यकारणी चे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी अभिनंदन केले व भविष्यात जास्तीत जास्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाटील, भूषण पाटील, सतीश पाटील, नितीन शिंपी यांचे सह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार कैलास त्याची यांनी मानले.

close