shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल नगर पालिके तर्फे गणेश स्पर्धेत माझी वसुंधराअभियानांतर्गत एरंडोल नगरपालिका मार्फत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न ...!!

एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल नगरपालिके तर्फे गणेश स्पर्धेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत एरंडोल नगरपालिका मार्फत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धेचे नगर पालिके तर्फे गणेश स्पर्धेत माझी वसुंधराअभियानांतर्गत एरंडोल नगरपालिका मार्फत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत एरंडोल शहरातील जवळपास ६० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.त्यानुषंगाने दि.०२/१०/२०२१ रोजी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शहरातील पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विक्रेते यांचा देखील सत्कार याठिकाणी करण्यात आला.पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धेचे विजेते पुढीप्रमाणे.
प्रथम क्रमांक – तेजस पवार
द्वितीय क्रमांक – पायल ठाकुर
तृतीय क्रमांक – विनीत बिर्ला
तसेच जय श्रीराम ग्रुप, गांधीपुरा यांनी देखील यात सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या शेवटी माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्षा आरती महाजन, मुख्य अधिकारी विकास नवाळे, अतुल महाजन, आनंद दाभाडे, सुरेश दाभाडे, हितेश जोगी, एस. आर.ठाकुर,अशोक मोरे, प्रियंका जैन आदि मान्यवर व नगर पालिका कर्मचारी उपस्थित होते.
close