प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील उत्राण येथे युवसेने तर्फे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते होतकरू व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाच्या वाटपाची संकल्पना जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांचीअसून ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व त्याची पूर्ण तयारी होऊन परीक्षेत समोर जाण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने उत्राण येथील 29 विद्यार्थ्यांना सदर पुस्तकाचे वाटप या वेळी करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती अनिल महाजन, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आनंदा चौधरी, तसेच उत्राण येथील दोन्ही गावाचे सरपंच,उपसरपंच , ग्रामपंचायत,सदस्य, मान्यवर तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ :-उत्राण ता. एरंडोल येथे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप प्रसंगी आमदार चिमणराव पाटील अनिल महाजन, आनंदा चौधरी व मान्यवर तसेच विद्यार्थी
दरम्यान यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व स्पर्धा परीक्षेत पास होऊन आपण आपल्या गावाचे व तालुक्याचे नाव मोठे कराली अशी अपेक्षा करतो असे सांगितले.
स्पर्धा परीक्षेचे पुस्तक स्वीकारतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल महाजन मानले.

