shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हा निवड चाचणीत पडस्थळचा पै. सौरभ कोकरे पात्र.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हा निवड चाचणीत पडस्थळचा पै. सौरभ कोकरे पात्र.
 

इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेसाठी पडस्थळ येथील सौरभ लक्ष्मण कोकरे याची निवड झाली आहे. पडस्थळ येथे(दि.२५ ऑक्टोबर) रोजी झालेल्या तालुका स्तरीय निवड चाचणी मधून सौरभ ने ७० किलो वजनी गटात गादी विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.
 

सौरभच्या या कामगिरीबद्दल गावातील ग्रामस्थांसह पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी पै. सौरभ कोकरे याचा सत्कार करून सौरभला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना महेंद्र रेडके म्हणाले की, सौरभ हा होतकरू व कष्टाळू मुलगा असून त्याने या अगोदरही कुस्ती मैदाने गाजवली आहेत. सौरभचे आई वडील शाकाहारी असून देखील त्यांनी सौरभला कुस्ती क्षेत्राकडे वळवले व सौरभची कुस्तीची आवड जपली. सौरभ चे वडील लक्ष्मण कोकरे हे पडस्थळ गावचे प्रगतशील बागायतदार असून त्यांना कुस्ती क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्राची देखील आवड आहे. ते भजन उत्तम प्रकारे गातात. सौरभने असेच पडस्थळ गावचे नाव उज्वल करावे, संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभा आहे व गावाला सौरभचा अभिमान वाटतो.
close