shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी येथे ओसरीवरील शाळेत विध्यार्थ्यांनी दिले कागदी पणतीद्वारे संदेश..

कौठळी येथे ओसरीवरील शाळेत विध्यार्थ्यांनी दिले कागदी पणतीद्वारे संदेश..
इंदापूर प्रतिनिधी: दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा परिषद  शाळा कौठळी येथे एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्डशीट पेपर वर पणत्यांचे आकार काढून त्यावर विविध संदेश लिहून जनजागृती करण्यात आली. वारंवार हात धुवा, मास्क वापरा,सामाजिक अंतर ठेवा,सेनेटायझर चा वापर करा,गर्दीत जाणे टाळा,प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा,व्यसनांपासून दूर रहा,सदृढ शरीर बनवा,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असे विविध संदेश देण्यात आले.एकमेकांच्या पणत्यांवरील संदेश वाचा व आनंदाने दिवाळी साजरी करा अशा शुभेच्छा देण्यात आल्या.मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, भारत ननवरे व आरती गायकवाड यांनी केले.केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
close