विद्या निकेतन फार्मसी मध्ये "मिशन युवा स्वास्थ" अंतर्गत कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी:लाखेवाडी येथील विद्या निकेतन फार्मसी महाविद्यालयांमध्ये डी.फार्मसी व बी.फार्मसी चे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले.
कोरोनाच्या दीर्घ सावटानंतर राज्यातील महाविद्यालय २० ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेशाची परवानगी दिली आहे,परंतु अजून काही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित आहे अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने *मिशन युवा स्वास्थ हे अभियान २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान राबविण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.श्रीमंत ढोले सर यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिली.यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव, उपाध्यक्षा सो.चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी सौ.जाधवर सुमती,आरोग्य सेवक महेश पवार,लाखेवाडी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,आशा सेविका कार्यालयीन अधीक्षक गणेश पवार, प्राचार्य सम्राट खेडकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

