तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत सहायक अभियंता जलसंपदा विभाग इंदापूर यांच्याकडे इंदापूर काँग्रेस कमिटीने दिले निवेदन पत्र.
तरंगवाडी भादलवाडी मदनवाडी तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे येणाऱ्या काळात या गावांमध्ये व वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो - स्वप्नील सावंत.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सहायक अभियंता जलसंपदा विभाग इंदापूरचे विराज जगदीश परदेशी यांच्या कडे इंदापूर येथे निवेदन देण्यात आले. त्यांना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी भादलवाडी मदनवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा याबाबतचे निवेदन पत्र देण्यात आले.
या निवेदन पत्रामध्ये मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांच्या नावे मौजे तरंगवाडी, भादलवाडी व मदनवाडी तलाव हा आपल्या आखात्यारीत येत असल्याने त्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्या तलावातून सभोवतालचे गाव, वाड्यावस्त्या यांना पाणीपुरवठा केला जातो. सदर परिस्थिती पाहता तरंगवाडी तलाव २० टक्के, भादलवाडी तलाव ४४ टक्के तर मदनवाडी तलाव ६१ टक्के असा साठा दि. २६ ऑक्टोबर २०२१ च्या खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूर यांच्या अहवाल प्रमाणे शिल्लक आहे. सदर माहितीनुसार खडकवासला धरण हे १०० टक्के भरलेले असून तरंगवाडी भादलवाडी व मदनवाडी तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे येणाऱ्या काळात या गावांमध्ये व वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.तरी आपण ह्या अर्जाचा सहानुभूती पूर्वक विचार करून तलावे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे. अशा आशयाचे पत्र स्वप्नील सावंत अध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, इंदापूर शहर अध्यक्ष चमन भाई बागवान, पुणे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काजी, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, युवा नेते आकाश पवार, इंदापूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुफियान जमादार, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीनिवास शेळके ,तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव महादेव लोंढे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार भगवान पासगे, डॉक्टर नवनाथ वाघमोडे, डॉक्टर शिवराज मोरे आदी कार्यकर्ते उपस्तिथ होते.

