एरंडोल प्रतिनिधी :-दिनांक १५/९/२१रोजी ५ गोवंश व दिनांक २१/९/२१रोजी ११ गोवंश असे वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेल्या एकूण १६ गोवंशांचा ताबा अनुक्रमे समर्पण गोशाळा भालगाव व कामधेनू गोशाळा धरणगाव यांच्या कडे कायम ठेवण्यात आला .खावटीपोटी सोळा गोवंशांना प्रती गोवंश ५० रुपये प्रती दिन समर्पण गोशाळा, भालगाव व कामधेनू गोशाळा धरणगाव यांना देण्याचा आदेश एरंडोल मे. न्यायालयाने केला .एरंडोलच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बजावलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर प्राणीमित्रांनी व बजरंग दलानी परत एकदा समाधान व आनंद व्यक्त केला असून गोवंश तस्करांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि.१५/९/२१ रोजी व २१/९/२१रोजी दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात विना परवाना एकूण १६ बैल(गोवंश) जीवंत स्थितीत दोराच्या साहाय्याने कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने कोणतीही काळजी न घेता दाटीवाटीने कोंबून भरलेल्या स्थितीत मिळून आल्याने दि.१५/९/२१ रोजी एरंडोल पोलिसांनी व दि.२१/९/२१ रोजी गोवंश प्रेमी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरील गोवंश पोलिसांच्या मदतीने जप्त करून पुढील संगोपनासाठी समर्पण गोशाळेत तसेच कामधेनू गोशाळा धारणगाव यांच्याकडे पाठविले सदरील कारवाई कामी प्रसाद दंडवते, विवेक ठाकूर,प्रकाश पाटील, विक्रांत ठाकूर, मुकेश भोई, सागर मराठे, शंतनू भेलसेकर, सागर महाजन व विहींप बजरंग दल एरंडोल तालुका कार्यकारणी यांनी कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका चोख बजावली..दरम्यान तुषार प्रभुलाल गोपाळ , प्रदीप लोटन पाटील व रामू अर्जुन शिंदे यांनी गोवंश परत मिळणेसाठी अर्ज मे.कोर्टात दाखल केला व गोवंशांचा ताबा मागितला त्यानंतर त्रयस्थ इसम समर्पण गोशाळा( तर्फे रामकृष्ण बाबूलाल पाटील)व कामधेनू गोशाळातर्फे चत्रभुज शामराव पाटील यांनी सदरील अर्जास तीव्र हरकत घेऊन गोवंशांचा ताबा कायम ठेवण्याचा व प्रतिदिन प्रती गोवंशांच्या पालनपोषण खावटी खर्चापोटी प्रती गोवंश प्रतिदिन तिनशे रु मिळावेत अशीमागणी केली.मा.न्यायदंडाधिकारी यांनी
दोनही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत समर्पण गोशाळेची व कामधेनू गोशाळेची खावटी मिळण्याची मागणी मान्य करीत पालनपोषण खर्चापोटी प्रतिदिन प्रती गोवंश( गो शाळेत दाखल झाल्या दिवसापासून) रक्कम रु ५० देण्याचे व सदरचे पैसे तात्काळ जमा करण्याचे आदेश मे .एरंडोल न्यायालयाने आरोपींना दिले .. दरम्यान समर्पण गोशाळा भालगाव व कामधेनू गोशाळा धरणगाव यांच्या वतीने ऍड राहुल एस पारेख ,ऍड अजिंक्य ए काळे व सरकारी वकील ऍड डी. बी. वळवी यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड आल्हाद एम काळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ..व ऍड आकाश एन महाजन व ऍड नीरज ए जगताप यांनी सहकार्य केले.
या ऐतिहासिक निर्णयाने प्राणीमित्र संघटनेने स्वागत केले तर गोवंश तस्करांना या निर्णयाने पुन्हा एकदा एकाप्रकारे चपराक बसली आहे .
सर्वात मोठी कारवाई गोवंश संरक्षण करणाऱ्या प्राणीमित्र संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे ..

