एरंडोल/प्रतिनिधी:-शहराची पर्यावरण गुणवत्ता व निसर्गाचा समतोल राखण्यास मदत व्हावी या दृष्टीने पर्यावरण पुरक इलेक्ट्रिक व्हेहीकल चे प्रदर्शन माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दि.२८/१०/२०२१ रोजी वेळ सकाळी ०९ ते सायं ०५ पोलिस कवायत मैदान एरंडोल येथे आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या ई-व्हेहीकल धोरण २०२१ नुसार राज्यात सन-२०२५ पर्यंत ई-व्हेहीकल चा हिस्सा वाढावा
यासाठी प्रयत्न केले जात आहे.सध्याच्या प्रचलित असणा-या पेट्रोल / डिझेल गाड्यांपेक्षा ई-व्हेहीकल हा फ़ायदेशिर असा पर्याय उपलब्ध झाला आहे. ई-व्हेहीकल किमतीने कमी ,वजनाने हलकी,कमी खर्चात जास्त किमी चालणारी,जेष्ठ नागरीक व महीला यांच्या साठी फायदेशीर असल्याने दिवाळीच्याशुभ मुहुर्तावर ई-व्हेहीकल चा पर्याय निवडावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.न्यु पार्वताबाई ई-बाईक सेवा एरंडोल यांच्या सहाय्याने प्रदर्शनआयोजीत केले आहे.गुजरात मधील वार्ड विझार्ड या कंपनी मार्फत बनविण्यात आलेल्या जॉय ई-बाईक प्रदर्शनामधे असणार आहे.एरंडोल शहरातील सर्व नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व प्रदर्शन ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

