shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे देवळाली प्रवरा येथे घट स्थापनेच्या दिवशी लाक्षणीक उपोषण..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

देवळाली प्रवरा: येथील श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात जाणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना स्वच्छ व निर्भय वातावरण निर्माण करून देणेसाठी व तेथे असलेल्या अनधिकृत पालक शिक्षक संघ रूपी राजकीय जोखडातून शाळेला मुक्त करण्यासाठी..., दि. ७ ऑक्टोबर (घट स्थापना) रोजी शाळेसमोर सकाळी ११ वा. पासून  अंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे लाक्षणीक उपोषण सुरू होत आहे. आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आपणहि उपोषण स्थळी उपस्थित राहुन या महत्त्वाच्या प्रश्नी आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. 
काय आहेत उपोषणाच्या प्रमुख मागण्या-
(१) नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती तात्काळ बरखास्त करा.
(२) शासन निर्णयातील तरतुदीनुसार पारदर्शक व नियमानुसार पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करावा. 
आपले नम्र,
आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

close