shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास अशा उपक्रमाच्या माध्यमातून मोठी संधी- हर्षवर्धन पाटील*

*स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास अशा उपक्रमाच्या माध्यमातून मोठी संधी- हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी:  मुव्हमेंट टीव्ही न्यूज (मराठी )आणि ए.आर  फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 ऑक्टोबर रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
  कोरोना काळात अनेक युवकांचे रोजगार गेले, या काळात परप्रांतीय आपल्या मूळ गावी परत गेल्यामुळे काही कंपन्या बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर आहेत. या सर्वांवर ती उपाययोजना करावी व सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळेल या उद्देशाने मुव्हमेंट टीव्ही आणि ए. आर. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामभैया गायकवाड यांनी या उपक्रमाचे आयोजन केले
 हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' या उपक्रमांतर्गत बेरोजगारांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला याचा आम्हाला आनंद वाटतो.या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळाल्यास  संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या आर्थिक विकास गती मिळेल.असे उपक्रम स्थानिक सुशिक्षित तरुण मुलांना रोजगार संधी उपलब्ध करून देतील'
   पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित कंपन्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
   मुव्हमेंट टीव्ही आणि ए. आर. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामभैया गायकवाड ,डायरेक्टर राजेशखान पटेल, राज्य सचिव साहेबराव ताटे, महाराष्ट्र राज्य प्रमुख सुरेश वाळेकर, युवा नेते अमोल इंगळे यावेळी उपस्थित होते.
  आयोजक शशिकांत सोनटक्के, दत्तकुमार डोंगरे, गणेश वाघ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
close