रेडा गावातील ग्रामस्थांनी विजयादशमीच्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत केला विजयउत्सव साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:
विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.
गावाबाहेरही शांतता राखुन जिकडे तिकडे सुख समृद्धी यावी असा यामागचा उद्देश प्रमाणे बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्राचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता
प्रस्तापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटायचे असते.
अशा परंपरेतील दसरा हा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी विजय उत्सव साजरा होत असताना रेडा गावातील ग्रामस्थ यांनी इंदापूर येथे दुधगंगा येथे येऊन महाराष्ट्राचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत "दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा". या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पुष्पगुच्छ आणि आपट्याची पाने म्हणजेच सोने सर्वांच्या वतीने दिल्या आणि आपल्या नेत्या समवेत आपला आनंद उत्सव खऱ्या अर्थाने विजयादशमीचा विजयोत्सव साजरा केला. याप्रसंगी एकमेकांमध्ये आदर्श विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली.
यावेळी रेडा गावातील बबनराव देवकर संचालक
नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना , राजेंद्र देवकर प्रगतशील बागायतदार, हनुमंत देवकर, नानासाहेब देवकर युवा नेते , ॲड. योगेश देवकर, सचिन जगदाळे, उमेश देवकर, रामभाऊ देवकर, संतोष देवकर, रेडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र पवार, रेडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य धनंजय गायकवाड ,सोमेश्वर देवकर तसेच दीलीप शहाणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

