पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत बंसल क्लासेसचा शुभारंभ व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा
विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - हरूणभाई इनामदार..!!
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहराच्या शैक्षणिक परंपरेला बळकटी देण्याचा प्रयत्न जीवन शिक्षण परिवाराने केला आहे. केज शहराचा शैक्षणिक आलेख वाढून तो राज्यस्तरापर्यंत पोहोंचला पाहिजे यासाठी जीवन शिक्षण परिवार प्रयत्नरत आहे. या शैक्षणिक समुहात एल.के.जी.ते उच्च शिक्षणापर्यंत ची सोय करून दिली आहे.
त्यासोबतच आगामी काळात केज शहर व परिसरातील डॉक्टर व इंजिनिअर होवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कोटा (राजस्थान) येथील शिक्षण क्षेत्रात नामवंत व देशभरात आग्रगण्य असलेल्या बन्सल क्लासेसची शाखा केज शहरात सुरू होत आहे. ही शाखा जीवन शिक्षण समुहाला सुरू करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येणार्या काळात केज व परिसरातील असंख्य डॉक्टर आणि इंजिनिअर दिसणार आहेत. बन्सल क्लासेस मध्ये देशभरातील नामवंत प्राध्यापक व तज्ञ मंडळी असणार आहे. मंगळवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शुभारंभ व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे.या प्रसंगी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जीवन शिक्षण समुहाचे सचिव हरूणभाई इनामदार यांनी केले आहे.
केज शहरामध्ये हरूणभाई इनामदार यांनी गेल्या पंधरा वर्षापासुन शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. कारण माणूस शिक्षणाने हा सबळ आणि प्रभावी होतो. ज्याच्याकडे विद्वता आहे.
त्याला संधी मिळत नाही. त्यामुळे गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून हारूणभाई इनामदार यांनी केज शहरात जीवन शिक्षण समुहाच्या वतीने एल.के.जी. ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासोबतच ग्रामिण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आज या परिवारामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेवून डोळस होत आहेत. आता जीवन शिक्षण समुहाने दो कदम आगे म्हणत कोटा (राजस्थान) येथील नामवंत व प्रसिद्ध अशा बन्सल क्लासेसची सोय उपलब्ध करून दिली आहे.
केज हे शैक्षणिक दृष्ट्या मागास राहू नये यासाठी इनामदार यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून केज शहरात इनामदार यांच्या जीवन शिक्षण समुहाला याची शाखा चालविण्याची जबाबदारी दिली आहे. हे केज शहराच्या विकासामध्ये महत्वाचे पाऊल असणार आहे. या बन्सल क्लासेसचा शुभारंभ मंगळवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जीवन शिक्षण संकुल बीड रोड, शिक्षक कॉलनी समोर केज येथे होत आहे. या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जि.प.च्या अध्यक्षा सौ.शिवकन्याताई सिरसाट या राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे आ.संजयभाऊ दौंड, बीड जि.प.चे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ.पृथ्वीराज साठे, अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर,अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, केज बाजार समितीचे माजी सभापती अंकुशराव इंगळे, ज्येष्ठनेते रणजित सिंह पाटील, सय्यद नवाब मामू, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, धारूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ईश्वर मुंडे, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजीअप्पा कापसे, धारूरचे माजी नगराध्यक्ष महादेव निर्मळ, प्रा.हनुमंत भोसले, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांची उपस्थिती असणार आहे. तर या भव्य दिव्य सोहळ्यात बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक आर.राजा. , बीड जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके, केजचे पोलिस उपअधिक्षक पंकज कुमावत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एम.शिंदे, केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके, केजचे गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व तरूण वक्ते अविनाश भारती यांचे शैक्षणिक विषयावर व्याख्यान होणार आहे.
तरी या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुंदडाताई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जीवन शिक्षण परिवाराचे सचिव हारूणभाई इनामदार, परळी येथील बंसल क्लाससेच अध्यक्ष चंदुलाल बियाणी, परळी येथील राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव बद्रीनारायण बाहेती, बंसल क्लासेस परळीचे संचालक डॉ.रामेश्वर बांगड, परळी येथील ब्रेन स्मिथ एज्युकेशनल सर्व्हिसेसचे संचालक प्रा.कैलास घुगे व सर्व कर्मचारी वृंद बंसल क्लासेस आणि जीवन शिक्षण परिवार केज यांच्या वतीने करण्यात आले आहे*.

