शरदचंद्र पवार यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा इंदापूर तालुक्यात एक हजार वस्तू वाटप करून साजरा करण्याचा संकल्प.
उद्या १९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा संकल्प.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणतेही एक १००० वस्तू गरीब व गरजूंना दान करण्याचे आव्हान.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन उद्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी अभिष्टचिंतन स्वरूपात करूया आणि गरीब गरजूंना इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून या दिवशी किंवा आठवड्यातभरात कोणतेही एक वस्तू १००० वाटप(विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दिवाळीनिमित्त गरजूंना एक हजार धान्याची किट, कपडे इत्यादी आपल्या बजेट प्रमाणे) करून त्यांना पुढील आयुष्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो अशी अंतकरणापासून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया या उद्देशाने सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा इंदापूर तालुक्यात संपन्न करावा असे आव्हान इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे यादिवशी आपल्या ग्रामदेवतेला अभिषेक होम हवन तसेच मज्जित चर्चमध्ये नमाज प्रार्थना देखील आयोजित करून याप्रकारे शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

