shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कवच-कुंडल लसीकरण मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या सोयीनुसार रात्रीचे लसीकरण ;जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक१६ ऑक्टोंबर २०२१.
श्रीरामपूर: श्रीरामपूर कोरोनाशी संबंधित कवच - कुंडल लसीकरण मोहिमेअंतर्गत श्रीरामपूरातील आजाद मैदान येथे आज गुरुवारी रात्रीचे लसीकरण सत्र विशेष बाब म्हणून आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून नागरिकांच्या सोयीसाठी व सोयीनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
        कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम वेगाने सुरु करण्यात आलेली आहे. या मोहिमेचा सर्वच घटकांनी आता लाभ घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र काहींना लसीकरणाच्या वेळी जाणे शक्य नसल्याच्या बाबी उघड झालेल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांच्या सोयीनुसार आता लसीकरण मोहिम हाती घेण्याचा उपक्रम श्रीरामपूरमध्ये  हाती घेण्यात आलेला आहे.

आज गुरुवारी रात्री साडेसात ते दहा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. दिवसभर कामातून वेळ मिळत नसल्याने लस घेता येत नाही अशी अनेक लोकांची अडचण असल्याने विशेष बाब म्हणून हे लसीकरण सत्र सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामूळे आज गुरुवारी नेहमीच्या वेळेव्यतिरीक्त हे अधिकचे लसीकरण सत्र आयोजित केले जात आहे. कोवीशिल्ड लस पहिला व दुसरा डोस (८४ दिवसानंतर) रात्री दिला जाणार आहे. 

आपल्या माहितीतील गोरगरीब, हातावर पोट असणारे, लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. कारण सोशल मिडिया वर ते नसतील कदाचित. फार अवघड नाही पण परिणामकारक नक्कीच असेल. यासाठी सोशल वापरणाऱ्या नागरिकांनी माध्यम सुद्धा समाजातील इतर घटकांमध्ये जागृती करून लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश बंड, वैद्यकिय अधिकारी डॉ. तौफिक शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close