shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आप्पासाहेब जगदाळे व राजवर्धन पाटील यांच्या हस्ते वावर मेन्स वेअर शाखा नंबर २ या कापड दुकानाचे उद्घाटन संपन्न.

आप्पासाहेब जगदाळे व राजवर्धन पाटील यांच्या हस्ते वावर मेन्स वेअर शाखा नंबर २ या कापड दुकानाचे उद्घाटन संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी: (१० ऑक्टोबर २०२१)शिर्के परिवाराचे युवा उद्योजक ऋतुराज शिर्के आणि शिवराज शिर्के यांच्या  मेन्स वेअरचे उद्घाटन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार  समिती चे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या  व  नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते अनुराधा लॉज, इंदापूर पोलीस स्टेशनच्या शेजारी संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती युवा उद्योजक निखिल इंगोले, कांतीलाल झगडे, कृष्णाजी यादव, अशोक घोगरे ,महादेव घाडगे, अरविंद वाघ ,रघुनाथ राऊत धनंजय पाटील, चित्तरंजन पाटील ,सुरेश मेहर, कालिदास देवकर ,अशोक इजगुडे , भीमराव काळे,दत्तात्रय शिर्के, नारायण नलवडे, राजेंद्र पाटील, रहिमान शेख व इंदापूर, वडापुरी तसेच तालुक्यातील मान्यवर आणि शिर्के परिवारातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, आज इंदापूर शहरामध्ये नव्याने वावर या कापड दुकानाचे उद्घाटन झालेचे जाहीर करतो. अकलूज या ठिकाणी वावर दुकान चांगले चालत असून त्याच पद्धतीने इंदापूर या ठिकाणी निखिल इंगोले यांच्या सहकार्यातून कापड दुकान वावर मेन्स वेअर शाखा नंबर २ ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. ऋतुराज आणि शिवराज या दोघा भावांनी इंदापूर शहरामध्ये रेडीमेड ब्रँडेड कपड्याचे दुकान सुरू केले आहे. दसरा जवळ आलेला असून मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदीसाठी तरुणांची रीघ लागलेली आहे अशा शब्दात तरुणांचे कपड्या बद्दलची आकर्षण  आपल्या भाषणातून दाखवून दिले.
तसेच ते पुढे म्हणाले की भविष्यकाळात या वावर कापड दुकानाची अजून शाखा निर्माण व्हावी अशी शुभेच्छा दोघा भावांना देतो. तरुण मुलांना ब्रँडेड कपडे मिळण्याची दालन या ठिकाणी तयार झालेली आहे ख-या अर्थाने आपल्या सर्वांनी तरुणांना सहकार्य करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे ते आपण कराल. भविष्य काळामध्ये त्यांचा व्यवसाय इंदापूर शहरामध्ये चांगल्याप्रकारे चालावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच नागरिकांनी कोरोणा हद्दपार झालेला नाही त्यामुळे काळजी घेऊन मास्क वापरावा. सण उत्सवाच्या काळामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
 
यावेळी प्रास्ताविक ऋतुराज  शिर्के यांनी केले तसेच युवा उद्योजक निखिल इंगोले यांनी वावर मेन्स वेअर या कापड दुकाना बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वडापुरी गावचे उपसरपंच विठ्ठल कदम यांनी केले.
close