शिर्डी प्रतिनिधी :
२२ ऑगस्ट २००४ सालाच्या आतील अधिनियम २००४ पुर्वीच्या विश्वस्त व्यवस्था मंडळ शिर्डीच्या द.म.सुकथनकर समितीच्या काळातील ठेकेदाराच्या मार्फत काम करत असलेल्या १६८७ कर्मचाऱ्यांपैकी १०५२ कर्मचारी हे श्री साईबाबा संस्थान आस्थापना वर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेतले व त्यातील राहिलेले कर्मचारी हे म्हणजेच ६३५ पैकी ५९८ कर्मचाऱ्यांना १०५२ कर्मचाऱ्यांन प्रमाणे श्री साईबाबा संस्थान आस्थापना वर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया श्रीमती भाग्यश्री ताई बानायत यांना श्री साईबाबा संस्थान आस्थापना वरील ५९८ कंत्राटी कर्मचारी यांनी सह्यांन सहित निवेदन दिले व एकमुखाने कायम होण्यासाठी मागणी केली.
व महोदया यांनी निवेदन स्वीकारले नंतर आपण शासन दरबारी हा विषय मांडुन १०५२ कर्मचाऱ्यांन प्रमाणे कायम होण्यासाठी पाठपुरावा करू असे ५९८ कर्मचारीबाबत आश्वासन दिले. त्याबद्दल आनंद व्यक्त करून ५९८ कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला भगिनींनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी अनिल आहेर, दत्तात्रेय देवकर, गोकुळ जाधव, धर्मरज कांदळकर, बाबासाहेब डोरवे, हनुमान हाले, जगदीश बुवा, अमोल शिंदे, कारभारी थेटे आदी उपस्थित होते.

