shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर लोणी एमआयडीसीमध्ये युवकांसाठी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करू - पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सचिन आहिर.पुणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न .

इंदापूर लोणी एमआयडीसीमध्ये युवकांसाठी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करू - पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सचिन आहिर.

पुणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न .
इंदापूर प्रतिनिधी:
उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली  इंदापूर लोणी एमआयडिसी येथे भव्य मेळावा घेऊन एमआयडीसीमध्ये युवकांसाठी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करू असे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सचिन  आहिर यांनी दि. १४ ऑक्टोंबर२०२१ रोजी पुणे सोलापूर रोड थेऊर  फाटा हॉटेल s4g याठिकाणी 
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या आदेशाने पुणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्यावेळी इंदापूर तालुक्यातील एमआयडीसीतील युवकांच्या प्रश्नावर सखोल चर्चा करताना त्यांनी अस्वस्थ केले .

 यावेळी  शिवसेना उपनेते तथा माजी खासदार  शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री तथा खासदार मावळ श्रीरंग बारणे , माजी राज्यमंत्री जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री  विजय  शिवतारे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद  सोनवणे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख महेश  पासलकर ,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश  कोंडे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 

तसेच यावेळी शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख नितिन शिंदे यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नाविषयी सखोल चर्चा केली. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इंदापूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसेच इंदापूर लोणी देवकर एमआयडीसी येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात हे विषय मांडल्यानंतर पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सचिन  आहिर  म्हणाले की, आपण उद्योग मंत्री सुभाषजी देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली  इंदापूर लोणी एमआयडिसी येथे भव्य मेळावा घेऊन एमआयडीसीमध्ये युवकांसाठी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करू असे अस्वस्थ केल्याची. तसेच लोकहिताच्या अनेक योजना संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी दिली.

यावेळी शिवसेना इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, शिवसेनाप्रणीत हिंदुस्थान माथाडी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे, शिवसेनाप्रणीत हिंदुस्तान माथाडी कामगार सेना सहचिटणीस पश्चिम महाराष्ट्र  राजू शेवाळे शिव सहकार सेना तालुका संघटक सुरज काळे हे उपस्थित होते
close