.कष्टक-या महिलांच्या कष्टाचे,मेहनतीचे कौतुक व्हावे यासाठी आम्ही अकलूजकर समूहाच्या वतीने त्यांचा सन्मान करणे हे कौतुकास्पद - सौ.शितलदेवी मोहिते-पाटील.
पालावर, अकलूज परीसरातील विविध बांधकामावर काम करणाऱ्या महिला, स्मशानभूमीत काम करणाऱ्या स्मशानजोगी समाजातील कष्टकरी महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान
इंदापूर प्रतिनिधी:नवरात्रामध्ये आदिशक्तीचा उत्सव साजरा करत असताना आपल्या आनंदासोबत कष्टक-या महिलांच्या कष्टाचे,मेहनतीचे कौतुक व्हावे यासाठी आम्ही अकलूजकर समूहाच्या वतीने त्यांचा सन्मान करणे हे कौतुकास्पद आहे असे मत शिवरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही अकलूजकर समूह,आर्टऑफ लिव्हिंग परीवार तसेच व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पालावर, अकलूज परीसरातील विविध बांधकामावर काम करणाऱ्या महिला, स्मशानभूमीत काम करणाऱ्या स्मशानजोगी समाजातील कष्टकरी महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास सुशिक्षित बेरोजगार महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. वनिता कोरटकर,सौ रोहिणी भोंग,राजीव बनकर ,सी ए विक्रम माने-देशमुख ,दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार आयोजक प्रा.धनंजय देशमुख यांनी केले.

