shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना राष्ट्रवादीचा "दे धक्का" ,तर...भाजपा पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी पक्षात इंकमिंग.!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

०१ ऑक्टोबर-२०२१.
 अहमदनगर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वातील झंजावात नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी. प्रांतिक पदाधिकाऱ्यांसमवेत नगर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी स्थानिक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणूकांचा कानमंत्र तर दिलाच परंतू विरोधी पक्षाला झटकाही दिला. या दौऱ्यात अनेक विरोधी पदाधिकाऱ्यांच्या हातात राष्ट्रवादीचे घडयाळ बांधण्यात ते यशस्वी ठरले.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, भेंडा, राहुरी, अकोले, श्रीगोंदा, संगमनेर, शिर्डी याठिकाणी आढावा बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीत इनकमिंगही होताना दिसली. राहुरी मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जयंत पाटील यांनी मोठा धक्का दिला. कर्डिले यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरत पक्षप्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली परिवार संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यात येऊन पोहचली. ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तसेच रोहीदास कर्डिले यांच्या पुढाकाराने नगर तालुका सहकारी दूध संघाचे संचालक मोहन तवले, भाऊसाहेब काळे, गोरक्षनाथ काळे, बजरंग पडळकर, रामदास शेळके, पुष्पा कोठुळे, वैशाली मते, राजाराम धामणे, उद्धव अमृते, स्वप्निल बुलाखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

    आगामी काळात या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त करून जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (तालुका प्रतिनिधी )📲7350591600.


close