shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वावरथ,जांभळी आणि जांभूळबन या गावांकरीता गुड न्यूज,मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गवांकरिता पूल बांधण्यात येणार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी:  मुळा धरण हे तालुक्याची तसेच शेवगाव, पाथर्डी, नेवासा, या तालुक्या करीता जलसंजिवनी म्हणून संबोधले जाते. हे धरण बांधल्यां पासुन ते आजपर्यंत वावरथ,जांभळी आणि जांभूळबन या गावातील ग्रामसथांनी पुल बांधणी करीता या गावातील ग्रामसथांनी  संघर्ष केला. या गावांतील सर्वांनाच तालुक्याच्या ठिकाणी यायचे असल्यास त्यांना जलमार्गाने ये जा करावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात, दवाखाना, मेडिकल, सर्व प्रकारचे शासकीय कामकाज छोटी-मोठी सर्व प्रकारची खरेदी अगदी आठवड्याचा भाजीपाला आणायला आणि विदयार्थी यांना देखिल लॉन्च प्रवासाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध  नाही. लॉन्च नादुरुस्त असेल तर तालुक्याच्या ठिकाणी पोहचने अशक्यच तसेच या लॉन्च चा एक ठराविक फेऱ्या असतात. शिवाय सायंकाळी ०६ वाजेनंतर लॉन्च देखिल बंद असते. म्हणून राहुरी येथे जाणे येणं सकाळपर्यंत बंद.
   आजपर्यंत वावरथ,जांभळी आणि जांभूळबन या गावांतील सर्वांनाच अडचणी येत असल्याने या त्यांनी अनेक वेळा मागणी केली, परंतु पुल बांधणी करीता मोठा  खर्च  येत असल्यानेत्यांची मागणी ही आजपर्यंत अधुरी आधुरी राहिली. 
     परंतु वावरथ,जांभळी आणि जांभूळबन या ठिकाणच्या   ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी अशी की राहुरी येथे ,राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र  राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंत पाटील साहेब व नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी राहुरी येथील राष्ट्रवादी  परिवार संवाद कार्यक्रमांमध्ये सांगितले की, वावरथ जांभळी,जांभूळबन या पुल बांधण्यासाठी किती मोठा खर्च असू द्या पूल बांधण्यात येईल,या पुलाला मंत्रिमंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे.
        मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाच्या मागणीबाबत आधीच निर्णय झाला असून या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग ५०-५० टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे अशी माहिती मा. जयंत पाटील यांनी दिली. 
       तसेच जाहीर सभेत  राज्याचे नगर विकास, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त  तनपुरे यांनी उपस्थीत केलेल्या  प्रश्नाला उत्तर नामदार जयंत पाटील साहेब यांनी दिले.
       वावरथ,जांभळी आणि जांभूळबन या गावांकरीता जलसंपदामंत्री यांनी तीन गावांकरिता न्यूज दिल्याने आणि  खूप दिवसापासून रखडलेले कामं आज नामदार जयंत पाटिल साहेब आणि राज्य मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने पुर्ण होण्याचे आश्वासन मिळाल्याने  वावरथ जांभळी जांभूळबन ग्रामस्थांच्यावतीने जाहीर आभार मानले.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600


close